आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोगत:महात्मा बसवेश्वरांचे विचार समतेचा मळा फुलवणारे : क्षीरसागर

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला आपल्या उपदेशातून संजीवनी देण्याचे महत कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलेले आहे. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो. प्राचीन धर्मग्रंथ हे प्रमाण नाहीत, स्त्रियांनासुध्दा समानतेचा हक्क आहे. देवळात देव शोधण्याची गरज नाही. श्रमातूनच कैलास प्राप्ती होते, असे बसवण्णांनी लोकांना हितोपदेश करून मानवतावादी आणि समतावादी लिंगायत धर्म सांगितला. त्याचा प्रचार व प्रसार केला. बसवण्णांचे सर्व विचार हे समतेचा मळा फुलवणारे आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

मंगळवारी (दि. ३) यशवंत उद्यान बीड येथे क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विलास बडगे, दिनकर कदम, राणा चौव्हान, नानासाहेब काकडे, रामेश्वर कानडे, अनिल मिटकरी, शिवशंकर भुरे, संजय घाळे, अशोक शहागडकर, दगडू म्हेत्रे, तेजस शेटे, सम्राटसिंह चव्हाण, बळीराम मिटकरी आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी बोलताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की, आज योगायोगाने महात्मा बसवेश्वर, भगवान परशुराम यांची जयंती एकाच दिवशी आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शहरात विविध कार्यक्रम होत आहेत. त्याच बरोबर आजच रमजान ईददेखील आहे. सामाजिक समतेचा, एकोप्याचा हा दिवस आहे. सर्वधर्म समभाव साजरा होणाऱ्या या दिवसानिमित्त समाज बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

महात्मा बसवेश्वरांनी बालवयापासूनच सामाजिक समतेचा संदेश देऊन जो कष्ट करतो, घाम गाळतो अशा समाजाला एकत्रित करून समाजात परिवर्तन घडवून आणले आहे. श्रम, कष्ट आणि गळ्यात लिंग धारण करतो तो वीरशैव समजला जातो. अक्षय तृतीया हा सण सामाजिक सण म्हणून ओळखला जातो. ही समाज जोडण्याची प्रक्रिया असून या जयंती उत्सवाच्या माध्यमातून सर्व समाज एकत्रित रहावा एकमेकांचे विचार आदान-प्रदान व्हावे हा यामागचा उद्देश आहे. मोठ्यांच्याप्रती आदरभाव निर्माण करणारा हा दिवस आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजले जाणारे हे मुहूर्त असून शुभ कार्याची सुरुवातच या दिवसापासून होत असते म्हणून सर्वांनी आनंदाने हा सण साजरा करावा असे ते म्हणाले. यावेळी वीरशैव समाजातील नागरिक व्यापारी उपस्थित होते.

कपिलधारच्या विकासासाठी २० कोटींचा प्रस्ताव पाठवला
बीड शहरात महात्मा बसवेश्वर यांचे भव्य असे स्मारक व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील आहे. श्री क्षेत्र कपिलधारच्या विकासासाठी २० कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेला आहे. यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...