आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाभाऊ साठे जयंती:टिळक, अण्णा भाऊ साठेंचे विचार आजही प्रेरणादायी ; त्यांच्या कार्यामुळे समाजजीवनाला दिशा मिळाली

बीड10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील विद्वेषी वातावरण दूर करणे आवश्यक आहे. यासाठी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज काळाला गरज आहे. कारण त्यांचे विचार आजही प्रेरणादायी व कालसुसंगत आहेत, असे प्रतिपादन दिव्य मराठीचे रिपोर्टर रवी उबाळे यांनी केले.बीड येथील स्वा.सावरकर माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. शालेय समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी, भाशिप्र संस्था शिक्षक प्रतिनिधी उमेश जगताप, पर्यवेक्षक विठ्ठल काळे, अभ्यासपूरक प्रमुख सुजाता चिंचपूरकर हे उपस्थित होते. कुलकर्णी यांनी लोकमान्य व लोकशाहीर ही उपाधी मिळणे सोपे नाही. तसे कर्तृत्व बाळ गंगाधर टिळकांचे व अण्णाभाऊ साठे यांचे होते. त्यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे समाजजीवनाला एक योग्य दिशा प्राप्त झाली, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक सविता कुलकर्णी यांनी केले. प्रतिक वाळेकर, आदित्य भालशंकर, नंदिनी खके, आकांक्षा महाद्वार, प्रतिक्षा जाधव यांनी विचार मांडले.