आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:सुंदरकांडाचे श्रवण सेवन करण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित; श्री क्षेत्र चाकरवाडी येथे आज संत अलकाश्रींच्या वाणीतून संगीतमय सुंदरकांडाचे आयोजन

बीड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री क्षेत्र चाकरवाडी येथे सोमवारी (ता.१३ जून) सकाळी १० वाजता माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विदर्भ मिरा संत अलकाश्रींजींच्या वाणीतून संगीतमय सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले आहे. या सुंदरकांडाचे श्रवण सेवन करण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंचक्रोशीतील माऊली महाराज भक्त परिवार आणि श्री महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी केले आहे.

या सुंदरकांडाचे मुख्य यजमान श्री महादेव महाराज चाकरवाडीकर आणि मानधने परिवार हे असणार आहेत. याप्रसंगी परळी-वैद्यनाथ येथील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात रिद्धी - सिद्धी पूर्वक अभिषेक केलेल्या एक लाख अकरा हजार रुद्राक्षांपैकी हजारो रुद्राक्षाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती चंदुलाल बियाणी आणि जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी यांनी दिली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता श्री क्षेत्र चाकरवाडी (ता. जि. बीड) येथे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विदर्भ मिरा संत अलकाश्रींजींच्या संगीतमय सुंदरकांडाचा लाभ घ्यावा तसेच धार्मिक कार्यक्रमांत सहभाग नोंदवावा. याठिकाणी विविध संत, महंतांचेही मार्गदर्शन होत असल्याची माहिती महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्यावतीने देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...