आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाख रुपय पळवले:स्कूटीची डिकी उघडून पळवले साडेतीन लाख

माजलगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोंढ्यातील व्यापारी दुकान बंद करून घरी जात असताना शहर पोलीस स्टेशन समोर एका टपरीवाल्याशी बोलत असताना चोरट्यांनी स्कुटीच्या डिक्की मध्ये ठेवण्यात आलेली साडेतीन लाख रोख रकमेची पिशवी पळवली. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

मोंढा भागातील पान मटेरियल व अन्य वस्तूंचे ठोक दुकानदार अनिल उर्फ बाळु शांतीलाल दुगड यांचे प्रेमशांती ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. अनिल दुगड हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे मेहुने श्रीपाल हिरालाल मुनोत हे संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान आवरून शहर पोलिस ठाण्यासमोर असलेल्या टपरीवाल्याशी बोलत असताना त्यांच्या डिकीत ठेवण्यात आलेली पैशांची पिशवी चोरट्यांनी पळवली. या पिशवीमध्ये ३ लाख ५२ हजार १०० रूपये होते.

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद
विशेष म्हणजे ही घटना जेथे घडली तेथेच माजलगाव शहरावर निगराणी ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. परंतु हे कॅमेरे देखभालीअभावी बंद पडलेल्या अवस्थेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...