आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा:बसमधून उतरताना पर्समधील साडेतीन लाखांचे दागिने लंपास

केज25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसमधून उतरत असलेल्या महिलेच्या पर्समधील पाकिटात ठेवलेले ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात अनोळखी महिलांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केले. ही केज शहरातील शिवाजी चौकात उघडकीस आली. अज्ञात २ अनोळखी महिलांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल केला.

तालुक्यातील नाव्होलीतील वृद्ध शेतकरी महादेव विठ्ठल जगताप यांची मोठी विवाहित मुलगी चंद्रकला या २ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता औरंगाबाद येथून मुलीसह महालक्ष्मी देण्यासाठी व भाऊ श्रीराम याच्या मुलाला पाहण्यासाठी माहेरी नाव्होली येथे औरंगाबाद-अंबाजोगाई बसने येत होत्या. त्यांनी येताना ५९ ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे दागिने हे पर्समधील पाकिटात ठेवले होते.

तर महादेव जगताप हे मुलगी व नातीला घेऊन जाण्यासाठी केज शहरातील शिवाजी चौकात बसची वाट पाहत बसले होते. ही बस दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकात येऊन थांबली असता चंद्रकला व त्यांची मुलगी पूजा या दोघी बसमधून उतरत असताना बसमध्ये पाळत ठेवून असलेल्या दोन अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील पाकिटात ठेवलेले २५ ग्रॅमचे सोन्याचे पट्टी गंठण, १० ग्रॅम वजनाचे मिनी सोन्याचे गंठण, ८ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, साडेआठ ग्रॅमचे सोन्याचे झुमके फुले, ४ ग्रॅमचे सोन्याचे मणिमंगळसूत्र, ५ ग्रॅमचे पत्ता मणी, १ ग्रॅमचे कानातील कुंडल, अर्धा ग्रॅमची सोन्याची नथ असे एकूण ३ लाख ५० हजारांचे दागिने घेऊन पोबारा केला. महादेव जगताप यांच्या फिर्यादीवरून अनोळखी २ महिलांवर केज ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सपोनि शंकर वाघमोडेंच्या मार्गदर्शनात पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...