आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई शहरात एका दिवसात तीन दुचाकी चोरीला गेल्या असल्याने शहरातील दुचाकीस्वार धास्तावले आहेत. गेवराई शहरात मागील सहा महिन्यात सहा कार व एक टेम्पो चोरीस गेला असल्याने पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. गेवराई शहरासह तालुक्यात दुचाकी, चारचाकी सह इतर वाहने चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत.
मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी दिवसभरात तिन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. मंगळवारी शहरातील बाजारतळ शास्त्री चौक येथून स्कुटी (क्र.एम एच २३ एपी ०७३१) कोल्हेर रोडवरील भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थाना समोरून (एम एच २३ पी ८७३९) , ताकडगाव रोडवरील न्यु हायस्कूल समोरील भागातून (एमएच २३ एव्ही ५०१२) अशा तीन दुचाकी एका दिवसांत चोरीला गेल्या असून तीन दिवसापूर्वी नाईकनगर येथून लहु चव्हाण यांची कार चोरीला गेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.