आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:तलवार बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; एका नगरसेवकाचाही सहभाग

केज6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरात जुनी धारदार तलवार मिळून आल्याने केज येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकासह तिघा बापलेकांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील रोजा मोहल्ला भागात बशिरोद्दीन महेबूब शेख यांच्या घरी १० मार्च रोजी दुपारी १२.१० वाजता पोलिसांना एक स्टिलची तलवार आढळून आली.

या तलवारीस काळ्या रंगाचे मॅन व पितळी रंगाचे कव्हर असून तलवारीच्या मुठीपासून १०० सेंटिमीटर लांबीची असून टोकापर्यंत धारदार आहे. मूठ पिवळसर रंगाची असून २० सेंटिमीटर लांबीची आणि ८० सेंटिमीटर धारदार पात्याची आहे. लोकहिताच्या दृष्टीने घातक असलेले शस्त्र तलवार कब्जात बाळगताना मिळून आले, अशी फिर्याद केज ठाण्याचे फौजदार दादासाहेब विजयकुमार सिद्धे यांनी दिल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अझहरोद्दीन बशीरोद्दीन शेख, बशिरोद्दीन महेबूब शेख, तखियोद्दीन बशीरोद्दीन शेख या तिघा बापलेकांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि शंकर वाघमोडे हे पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...