आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:नांदेडमध्ये गोदावरीत बुडून तिघांचा मृत्यू, विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिराच्या पाठीमागे गोदावरी नदीपात्रातील घटना

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिराच्या पाठीमागे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

नांदेड येथील विजयनगर भागातील जय रूपेश पुजारी (१९), त्याचा मित्र गजानन राजू हाटकर (२८, रा. दत्तनगर, नांदेड) व संतोष पुंडलिक भोंग (२२, रा. नमस्कार चौक, नांदेड) हे तिघे होळी खेळून काळेश्वर मंदिरामागे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा बुडून मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...