आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकत्र‎:बीडच्या कौटुंबिक सल्ला केंद्रातून‎ दुरावलेली तीन कुटुंबे पुन्हा एकत्र‎

बीड‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील यशवंतराव चव्हाण ‎केंद्रांतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून कौटुंबिक सल्ला, मार्गदर्शन, ‎ ‎ समुपदेशन,कायदेशीर मदत केंद्र‎ सुरू करण्यात आले आहे. दीड ‎महिन्यात या केंद्राच्या माध्यमातून ‎तीन कुटूंब एकत्र आले असुन दुरावलेली नाती पुन्हा जुळली‎ आहेत अशी माहिती अॅड. हेमा ‎ ‎ पिंपळे यांनी दिली.‎ पुढे बोलतांना त्या म्हणाल्या‎ की, घरी मध्यस्थ नसल्यामुळे ‎समुपदेशन, सल्ला, मार्गदर्शन‎ केंद्र असणे ही सामाजिक गरज‎ आहे. घरात कोणी नसल्याने मी‎ पणा वाढीस लागतो. म्हणुन‎ कौटुंबिक समस्या वाढत आहेत.‎

यातून मार्ग काढण्यासाठी‎ कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन‎ केंद्राच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न‎ करत असल्याचे अॅड. हेमा पिंपळे‎ यांनी सांगीतले. ‎जिल्ह्यातील‎ गरजूंनी या मदत केंद्राशी संपर्क‎ करावा असे आवाहन‎ अॅड.पिंपळे, उमेश होमकर,‎ बबिता मेंगडे यांनी केले अाहे.‎ खासदार सुप्रिया सुळे यांच्या‎ संकल्पनेतील हे केंद्र बीडला सुरु‎ झाल्यामुळे दुरावलेली जोडपी पुन्हा‎ एकत्र नांदणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...