आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्राईम:शेतीच्या वादातून मांगवडगाव शिवारात तिघा बापलेकांची हत्या; एक महिला जखमी, 12 जणांविरुद्ध गुन्हा

केजएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आरोपींनी मृतांच्या चार दुचाकी आणि जीवनावश्यक वस्तू जाळून टाकल्या

शेतीचा निकाल लागल्याने शेतीचा ताबा घेऊन नांगरणी करण्यासाठी गेलेल्या पारधी समाजाच्या कुटुंबावर हल्ला करीत तिघा बापलेकांची धारदार शस्त्रांनी हत्या केल्याची थरारक घटना केज तालुक्यातील मांगवडगाव शिवारात १३ मे रोजी रात्री ९ ते १३.३० वाजेच्या दरम्यान घडली. या एक महिला जखमी झाली असून इतर दोघा भावांनी तेथून पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. तर आरोपींनी मृतांच्या चार दुचाकी आणि जीवनावश्यक वस्तू जाळून टाकल्या. याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

मांगवडगाव येथील पवार व निंबाळकर कुटुंबात २० एकर १२ गुंठे जमिनीचा वाद मागील १५ वर्षांपासून आहे. तर शेतीच्या वादामुळे पवार कुटुंब हे सन २००६ सालापासून अंबाजोगाई येथील यशवंतराव चौकात वास्तव्यास आहे.

सदरील जमीन ही निंबाळकर कुटुंबाकडे होती. मात्र दोन वर्षांपूर्वी जमिनीचा निकाल पवार यांच्या बाजूने लागलेला होता. परंतु त्यांनी जमिनीचा ताबा घेतलेला नव्हता. १३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पवार कुटुंबातील बाबू पवार आणि त्यांची मुले, सुना, नातवंडे एका  ट्रॅक्टरमधून मांगवडगाव शिवारातील शेतीत आले होते. शेतात पवार कुटुंब आल्याची माहिती मिळताच सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत उर्फ पिंटू मोहन निंबाळकर व इतर नऊ ते दहा जण एक ट्रॅक्टरमधून आले. त्यांनी पवार कुटुंबियांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिघांना जायबंदी करीत हातातील तलवार, कुऱ्हाड, लोखंडी गज काठीने हल्ला केला. यात बाबू शंकर पवार ( वय ७० ), प्रकाश बाबू पवार ( वय ४५ ), संजय बाबू पवार ( वय ४० ) या तिघा बापलेकांची त्यांनी निघृण हत्या केली. तर दादुली प्रकाश पवार ( वय ४० ) ही महिला गंभीर जखमी केले. तर 

या मारेकऱ्यांचे उग्र रूप पाहून धनराज बाबू पवार, शिवाजी बाबू पवार आणि इतर महिलांनी तेथून शेतातून अंधारातून पळ काढत जीव वाचविला.  त्यांनी पोलिसांना माहिती कळविल्यानंतर युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद झोटे व केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. तर जखमी महिलेस अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. धनराज बाबू पवार ( वय २५ ) याच्या फिर्यादीवरून सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत उर्फ पिंटू मोहन निंबाळकर व इतर नऊ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांनी संशयित १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस हे पुढील तपास करत आहेत. तर संशयित १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

बातम्या आणखी आहेत...