आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:डिझेल चोरी करताना‎ तीन जणांना पकडले‎

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंधारा कामावर लावलेल्या‎ टिप्पर मधील डिझेल चोरी करताना तीन‎ जणांना पकडण्यात आले. त्यांना‎ पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्या‎ विरोधात गुन्हा नोंदवला गेला.‎ माजलगाव तालुक्यातील लोणी‎ सांगवी येथे बंधाऱ्याचे काम सुरु आहे.

‎ श्रीहरी असोसीएटस् या कंपनीकडून हे‎ काम सुुुरु आहे. गुरुवारी रात्री‎ बंधाऱ्याच्या कामावर असलेल्या टिप्पर‎ (क्र. एम एच २०, इजी ४२८४) मधील‎ २५ लिटर डिझेल चोरी करताना अजय‎ लालु कुलाल, योगेश मुरलीधर इंगळे‎ (दोन्ही, रा. वडगाव ता. लोणार, जि.‎ बुलढाणा) व विजय रमेश पवार (रा.‎ शिवाणी टाकळी, जि. छत्रपती‎ संभाजीनगर) या तिघांना कामावरील‎ कामगारांनी व नागरिकांनी पकडले.‎ त्यांना माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या‎ ताब्यात देण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...