आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारस्ता आणि पुलाअभावी पाण्यातून प्रवास करणाऱ्या शिंदेवस्तीकरांचे निवडणुकीत तराफे जाळले होते. अखेर, त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून आ. सुरेश धस यांच्या पुढाकारातून ३ लाख रुपये किमतीचे ३ तराफे शिंदेवस्तीकरांना भेट दिले . रस्ता होईपर्यंत सुरक्षित प्रवासाची त्यांची सोय झाली आहे. पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिंदेवस्ती येथे जाण्यासाठी नागरिकांना रस्ता नाही किंवा पुलही नाही. त्यामुळे त्यांना तलावाच्या पाण्यातून थर्माकोलच्या चप्पूवरुन जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. अनेक वर्षे हा त्रास सहन करावा लागल्यानंतर माध्यमांतून आलेल्या बातम्या आणि सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गणेश ढवळे यांनी केलेल्या आंदोलनामुळे ही बाब मुंबई येथील बांद्रेवाडीकर गणेश मंडळाला कळाली होती. त्यांनी ग्रामस्थांना सुरक्षित प्रवासासाठी तीन तराफे भेट दिले होते. मागील वर्षे, दोन वर्षे या तराफ्यातून प्रवास नागरिक करत होते.
दरम्यान, नुकतीच सौताडा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीदरम्यान शिंदेवस्तीवरील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीकडे होत असलेल्या दूर्लक्षाच्या निषेघार्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. यानंतर दहा दिवसांपूर्वी मध्यरात्री शिंदेवस्तीकरांचे तराफे अज्ञातांनी जाळले होते. त्यामुळे पुन्हा शिंदेवस्तीवरील नागरिकांना थर्माकोलच्या चप्पूवरुन प्रवास करण्याची वेळ आली होती.
शिंदेवस्तीवर नागरिकांना तराफे दिल्याने त्यांचा प्रवास सुरक्षित झाला ३० लाखांचा निधी पडून ३० लाख रूपये निधी गटविकास आधिकारी यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी वर्ग करण्यात आला असून एका शेतकऱ्याने अडवलेला रस्ता तहसिलदार यांनी मोकळा करून दिला नाही त्यामुळेच निधी अखर्चित आहे. - डॉ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते, बीड
नागरिकांनी मानले आभार दरम्यान, तराफे जाळल्यानंतर नाराज झालेल्या नागरिकांनी तराफे मिळाल्यानंतर आमदार सुरेश धस यांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.