आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:खदानीत बुडून तीन भावंडाचा मृत्यू! पोहता येत नसतानाही दोघांना वाचवण्याचा मुलीने केला प्रयत्न

परळी (धनंजय आढाव)9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परळी शहराजवळील दाऊतपूर शिवारातील दुर्देवी घटना

कपडे धुण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील एका खदानीवर गेलेल्या तिन भावंडांचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी (दि.8) सकाळी परळी तालुक्यातील दाऊदपूर शिवारात घडली. मृतांत दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे.

नांदेड शहरातील आकाशावाणी परिसरातील हे कुटुंब असून कामानिमित्त दाऊदपूर शिवारात वास्तव्यास होते. सोमवारी सुरेखा राजाराम दांडेकर (15), रेखा राजाराम दांडेकर (13) आणि रोहित नारायण दांडेकर (8) हे तिघे खदानीत गेले हाेते. 

रोहित खदानीत खेळताना बुडत होता हे पाहून आधी रेखाने उडी घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, तिलाही पोहता येत नव्हते तिही बुडत असल्याने सुरेखाने उडी घेतली. दुर्देवाने तिघांचा बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नागरिकांनी तिन्ही मुलांचे मृतदेह खदानीबाहेर काढले. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिासांनी भेट दिली पंचनामा प्रक्रिया सुरु होती. 

बातम्या आणखी आहेत...