आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:जिल्ह्यात तिघांच्या आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील चोवीस तासांत जिल्ह्यात विविध कारणांनी तीन जणांनी आत्महत्या केली. दोघांनी गळफास, तर एकाने विष घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील भीमा बाबूराव कोटमोरे (५६) यांनी ५ जून रोजी विष प्राशन केले होते. त्यांना कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

दुसरी घटना बीड तालुक्यातील मुर्शदपूर येथे घडली. परशुराम तुकाराम जगताप (४०) या पेंटरने दारूच्या नशेत घरातच गळफास घेतला. दीड वर्षापासून त्याची पत्नी माहेरी होती. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तिसरी घटनाही बीड तालुक्यातील उम्रद खालसा येथे घडली. शिवणकाम करणारा चंद्रकांत भारत जाधव याने दारूच्या नशेत गळफास घेतला. घरी यायला उशीर झाल्याने वडिलांनी त्याला समज दिली होती. यानंतर मोबाइल चार्जिंगला लावून येतो म्हणून तो खोलीत गेला व लोखंडी हूकला दोरीने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...