आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅरेथॉनमध्ये यश:तीन वेळा हाफ आयर्नमॅन, एक वेळा साताऱ्यात नाइट मॅरेथॉनमध्ये यश

रवी उबाळे | बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळ, व्यायामातून आराेग्य जपणे. आराेग्य हीच माेठी संपत्ती आहे. ते चांगले ठेवण्याचा संदेश देण्यासाठी जगातील ५५ पेक्षा अधिक देशांमध्ये आयर्नमॅन स्पर्धा घेतल्या जातत. यात धावणे, पाेहणे आणि सायकलिंग या तीन स्पर्धा असतात. याचे एकूण २२५.८ किलाेमीटर अंतर असते. १७ तासांच्या आत तिनही स्पर्धेत सलग यश मिळवण्याचे उद्दिष्ट असते.

यंदाच्या वर्षाच्या कजाकिस्तान या देशातील स्पर्धेत बीड शहरातील ऑर्थो स्पेशालिस्ट डाॅ. आनंद वैद्य यांनी १५ तास १९ मिनिटांमध्ये २२५.८ किलाेमीटरचे अंतर पूर्ण करून बीड जिल्ह्याचे पहिले ‘आयर्नमॅन’ हाेण्याचा किताब पठकावला. डाॅ. वैद्य यांनी २०१४ पासून सलग आठ वर्षे धावणे, पाेहणे आणि सायकलिंगचा सराव करत तीन वेळा हाफ आयर्नमॅन, तर एक वेळा साताऱ्यातील नाइट मॅरेथॉन सर केल्यानंतर कजाकिस्तान येथे झालेल्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत यश संपादित केले.

डाॅ. वैद्य यांनी २०१७ ,२०१८, २०१९ या तीन वर्षामध्ये हाफ आयर्नमॅन किताब मिळवला आहे. त्यानंतर डाॅ. वैद्य यांनी मार्च २०१९ साताऱ्यामध्ये नाइट मॅरेथॉन स्पर्धेत (४२ किलाे मीटर धावणे) सहभाग घेतला. त्यातही त्यांनी यश मिळावले. नागपूर येथे फेब्रुवारी २०२० मध्ये टायगरमॅन स्पर्धेत डाॅ. वैद्य सहभागी हाेऊन विजय मिळवला. अखेर २०२२ वर्षाच्या आयर्नमॅन स्पर्धा कझकिस्तान येथे जाहीर झाल्या. पाच दिवसांचा मुक्काम करून १४ आॅगस्ट २०२२ या एकदिवसीय आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी बीड जिल्ह्याचा पहिला आयर्नमॅन हाेण्याचा मान मिळवला आहे.़

आयर्नमॅन समूहाबद्दलची माहिती
पाेहणे, धावणे आणि सायकलिंग या तीन प्रकारच्या सर्वात माेठ्या प्रमाणात स्पर्धा आयाेजित करणारा आयर्नमॅन समूह म्हणून जगात आेळखला जाताे. या समूहाद्वारे दरवर्षी दहा लाखांहून अधिक सहभागी खेळाडूंना सहनशक्ती, तंदुरुस्त आराेग्य ठेवण्याचे फायदे हाेतात. सन १९७८ मध्ये आयकॉनिक आयर्नमॅन ब्रँडची स्थापना झाली आहे. आयर्नमॅन समूहाने एकल रेस (वैयक्तिक स्पर्धा) म्हणून ५५ पेक्षा देशांमध्ये स्पर्धांचे आयाेजन केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...