आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींचा लक्षणीय सहभाग:धर्मांतराच्या विरोधात कायदा कडक करा; माजलगाव शहरात निघाला मूक मोर्चा

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लव्ह जिहाद विरोधात आणि धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी रविवारी महालगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हजारो नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला.

माजलगाव शहरातील झेंडा चौक भागातून मूक मोर्चाची सुरवात शिवाचार्य चंद्रशेखर महाराज यांच्या उपस्थितीत झाली. या मोर्चात महिलांची, महाविद्यालयीन मुलींची संख्या लक्षणीय होती. मोर्चाची सुरुवात ध्येय मंत्राने करण्यात आली व मोर्चाचा शेवट प्रेरणा मंत्राने केला गेला. जिल्ह्यातील हा पहिला हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चा ठरला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने सर्व हिंदू समाजबांधव सहभागी होते. छत्रपती संभाजी महाराज चौकात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मोर्चात तालुक्यातील डॉक्टर, वकील व्यापारी, शिक्षक, प्राध्यापकांसह हजारो विद्यार्थी सामील होते या प्रसंगी सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...