आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:सततच्या नापिकीला कंटाळून ; आनंदवाडीतील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सततच्या नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने स्वत:च्या कृषी दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मैंदवाडी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. महारुद्र सीताराम तिडके (३५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मैंदवाडी येथील महारुद्र तिडके हे मागील काही दिवसांपासून सततच्या शेतजमिनीच्या नापिकीमुळे चिंताग्रस्त झोले होते. सोमवारी रात्री साडेनऊ वाजेदरम्यान गावात असलेल्या स्वतःच्या कृषी साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याची माहिती मिळताच पोलिसांनी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी पाठवला. मैंदवाडी येथे मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. महारुद्रच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आईवडील असा मोठा परिवार आहे. आत्महत्याप्रकरणी धारूर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...