आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या:बीड तालुक्यातील शिवणी गावातील प्रकार

बीड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची केली नोंद

लग्न करण्यासाठी एका तरुणाकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून २३ वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील शिवणी येथे शुक्रवारी घडली. दरम्यान, याप्रकरणी मृत तरुणीच्या कुटुंबीयांकडून तरुणावर आरोप केले गेले असले तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता.

जयश्री गोरक्ष राठोड (२३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे आईवडील हे ऊसतोडणीसाठी कर्नाटकात गेलेले आहेत. ती आजी-अजोबांसोबत शिवणी येथेच होती. दरम्यान, शिवणी परिसरातीलच एका तांड्यावरील तरुण जयश्रीला मागील काही दिवसांपासून छेड काढून त्रास देत होता. ‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत तो मागे लागला होता. जयश्रीने त्याला नकार देऊनही तो सतत तगादा लावून त्रास देत होता. याला कंटाळून गुरुवारी रात्री जयश्रीने राहत्या घरी विष प्राशन केले होते. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी पहाटे तिचा उपचारादम्यान मृत्यू झाला. दरम्यान, ज्या तरुणामुळे जयश्रीने आत्महत्या केली त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटंुबीयांनी केली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला गेला. याप्रकरणात शोकाकुल वातावरणात शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...