आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन होते. परंतु, अनलॉकमुळे आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे पेट्रोल-डिझेल आणि गॅस इंधन दरवाढ झाली, अशा एकापाठोपाठ एक संकटांना मागे टाकत परिस्थिती बदलत आहे. शनिवारी घरोघरी नववर्षाच्या स्वागतासाठी चैतन्याची गुढी उभी करण्याचा मुहूर्त सूर्योदयापासून आहे.
बांबू (वेळू)चे भाव ८० ते १२० रुपयांपर्यंत
गुढी उभी करण्यासाठी आवश्यक असलेल्या बांबू (वेळू)ची किंमत ८० ते १२० रुपये होती. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बांबू विक्रीसाठी उपलब्ध होते.
शंभर रुपये किलो लहान साखरगाठी
बीड शहरात गुढीपाडव्यासाठी हातगाड्यांवर साखरगाठी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. लहान गाठ्या १०० रुपये किलो, तर मोठ्या गाठ्या २०० रुपये किलोप्रमाणे विकल्या गेल्या. तिरंगा गाठ्याही होत्या.
सूर्यादयापासून गुढी उभारण्यासाठी मुहूर्त
शनिवारी सकाळी ६.१० वाजता सूर्योदयापासून साडेआठ वाजेपर्यंत अमृतसिद्धी योग आहे. त्यानंतर साडेआठ ते १०.४० पर्यंत सर्वार्थसिद्धी योग आहे, या मुहूर्तावर गुढी उभारू शकता.-सूर्यकांत मुळे, ज्योतिषविशारद, बीड
विविध धान्याचा वापर करून उभारली गुढी
मूगडाळ, तूरडाळ, मसूर डाळ, हिरवी मुगाची डाळ, तांदूळ, गहू, मटकी, काळे मनुके वापरून येथील सायली संजय कुलकर्णी या युवतीने गुढी उभारली आहे. धान्य वाया जाणार नाही याची काळजीही घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.