आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आजचे आंदोलन केले स्थगित

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील शिंदे वस्तीवरील नागरिकांना रस्ता उपलब्ध करुन देण्याबाबत तहसिलदारांनी आश्वासन दिल्यानंतर आज सोमवारी करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी दिली. पाटोदा तालुक्यातील सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत शिंदेवस्ति (गारमाळ) येथील मुलामुलींच्या शिक्षणाचा रस्ता नसल्यामुळेच गैरसोय होत आहे. जीव धोक्यात घालून तराफाद्वारे प्रवास करत लागत असून २ वर्षापासून वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखालील आज सोमवार रोजी शिंदेवस्तीवरील रामेश्वर साठवण तलावात ग्रामस्थांसह जलसमाधी आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता.

त्याच अनुषंगाने पाटोदा तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत नायब तहसीलदार सुनिल ढाकणे, सपोनि आर.एम.पवार, गटविकास आधिकारी सुमित जाधव, उप अभियंता एम.राजपुत, मंडळ आधिकारी एम.एस.बडे, निवेदनकर्ते डाॅ.गणेश ढवळे ,बाल हक्क संरक्षण संघ पाटोदा तालुका सचिव हमीदखान पठाण ,शिंदे वस्तीवरील नानासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, राजेंद्र शिंदे, दत्ता शिंदे, नामदेव शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. शिंदे वस्तीवर जाण्यासाठी पुलाची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी संपादीज जमीनीचा मावेजा शेतकऱ्यांना दिला जात आहे. रस्ता, पुल होईपर्यंत ग्रा.पं. कडून तराफा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...