आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आजचे युवा खेळाडू हेच उद्याचे भविष्य; शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे प्रतिपादन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्याने महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला अभिमान वाटावा असे खेळाडू दिले आहेत. आजचे युवा क्रिकेटर उद्याच्या क्रिकेटविश्वाचे भवितव्य असतील, असे विधान शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले.बीड येथे अनिल जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त १६ ते २० या वयोगटातील मुलांसाठी नॉकआऊट क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. जिमखाना क्रिकेट क्लब व केसोना क्रिकेट क्लब यांच्यात होणाऱ्या मॅचचा टॉस अनिल जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व सामने टी २० असलेल्या या नॉकआऊट लीगमध्ये एकूण आठ संघ सहभागी असणार आहेत.

फायनल मॅच ३० ओव्हरची असेल. या लीगचे आयोजन सहकार सेनेचे जिल्हा संघटक पंकज कुटे यांनी केले आहे. लीगच्या उद्घाटनप्रसंगी अनिल जगताप यांच्यासोबत आयोजक पंकज कुटे, शिवसेनेचे नेते पप्पू बरिदे, युवा नेते आकाश जगताप, राहुल बागलाणे, राजेंद्र बहिर, सुशील शिंदे, चंद्रसेन काळे यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या खेळाडूंची उपस्थिती होती.

या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर पारितोषीक ठेवण्यात आले आहेत. प्रथम पारितोषिक सात हजार सातशे, द्वितीय पारितोषिक पाच हजार पाचशे, तर मॅन ऑफ द सिरीज दोन हजार रुपये असणार आहे. या लीगची संपूर्ण जबाबदारी आदर्श क्रिकेट क्लबचे कोच अझर शेख यांच्याकडे आहे.

बातम्या आणखी आहेत...