आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलाचा चावा:डुकराने चावा घेतल्याने चिमुकला जखमी

आष्टी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी शहरातील फुलेनगर भागातील डुकराने एका लहान मुलाला चावा घेतल्याची घटना घडली आहे. शहरातील डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी फुलेनगर भागातील नागरिकांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आष्टी शहरात मागील सहा महिन्यांत डुकरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोमवारी सकाळी फुलेनगरात एका लहान मुलाचा चावा वराहाने घेतला होता. निवेदनावर आकाश पवळे, राजू वाघमारे, सनी वाघमारे, रियाज पठाण, अरबाज खान यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाच्या प्रती वन अधिकारी, जिल्हाधिकारी यांना पाठवल्या.

बातम्या आणखी आहेत...