आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टूलकिट प्रकरण:शंतनू मुळूकच्या घरातून हार्डडिस्क, पुस्तक, पर्यावरणाचे पोस्टर जप्त

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली पोलिसांकडे सर्च किंवा जप्ती वॉरंट नसतानाही १२ फेब्रुवारी रोजी आपल्या घराची झडती घेत संगणक हार्डडिस्कसह इतर साहित्य जप्त केले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकाराची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी टूलकिट प्रकरणातील आरोपी शंतनू मुळूकचे वडील शिवलाल मुळूक यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवलाल मुळूक यांनी शनिवारी रात्री पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, मी एक कर्तव्यदक्ष नागरिक आहे.

बीड शहरातील चाणक्यपुरी येथील माझ्या घराची झडती दिल्ली पोलिसांनी घेत शंतनूच्या रूममधून एका संगणकाची हार्डडिस्क, एक पुस्तक, मोबाइल कव्हर व पर्यावरण पोस्टर जप्त केले आहे. दिल्ली येथे गेल्यानंतर हे साहित्य परत दिले जाईल, असे तोंडी आश्वासन दिल्ली पोलिसांनी दिले. पण हे सर्व करत असताना त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी आम्हाला शोध अथवा जप्तीसंदर्भातील वॉरंट दाखवले नाही. तसेच जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामाही केला नाही. ही कारवाई करताना स्थानिक प्रशासनातील अधिकारी त्यांच्या सोबत नव्हता.

विश्रामगृहावर बोलावून चौकशी : १२ फेब्रुवारीपासून ते लोक बीडमध्येच थांबलेले होते. त्यांनी मला दोन ते तीन वेळा कॉल करून शासकीय विश्रामगृहावर बोलावून घेत शंतनूबाबत चौकशी केली होती. दिल्ली पोलिसांनी घराच्या झडतीचे पत्र किंवा साहित्य जप्तीचे पत्र न दाखवता कारवाई केली. या प्रकाराची नोंद घेऊन बीड पोलिस अधीक्षकांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मुळूक यांनी निवेदनाद्वारे अधीक्षकांकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...