आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर कोसळला:लिंबागणेश येथे पाच परस विहिरीमध्ये ट्रॅक्टर कोसळला; चालक गंभीर जखमी

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे गणेशनगर वस्तीवर खरीप उचलत असताना विहिरीचा अंदाज न आल्याने मागे येणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजता घडली.

भाऊसाहेब वायभट यांच्या शेतात जेसीबी आणि ट्रॅक्टरने खरीप उचलून बांध भरण्याचे काम होते. २ मे रोजी रात्री ८ वाजता विहिरीचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर मागे घेत असताना ट्रॅक्टर ५ परस खोल विहिरीत कोसळला. या अपघातात चालक अशोक अर्जुन गोंडे (२५, रा.लिंबागणेश, ता.जि.बीड) गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ बीडच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

बातम्या आणखी आहेत...