आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू उपसा:वाळू उपशाविरुद्ध कारवाईत ट्रॅक्टरची पोलिसाला धडक, खामगावमधील प्रकार; सहा ट्रॅक्टर केले जप्त

गेवराई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खामगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावरून एस.पी पथकाने सोमवार रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास गोदावरी नदीत कारवाई करत ६ ट्रॅक्टर पकडले. या कारवाईत पथकातील पोलिस नाईक गणेश धनवडे यांना ट्रॅक्टरने धडक दिल्याने जखमी झाले, त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल केले.

गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा काही केल्याने थांबत नसल्याचे चित्र दिसत असून तालुक्यातील खामगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती एस.पी. पथकाला मिळाल्यावरून सोमवारी खामगाव येथील गोदावरी नदीपात्रात कारवाई करत तब्बल ६ ट्रॅक्टर पकडले. यावेळी गणेश धनवडे हे ट्रॅक्टरला पकडण्यासाठी गेले असता ट्रॅक्टरने धडक दिली.

बातम्या आणखी आहेत...