आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू साठा जप्त:बोरगावात ट्रॅक्टर, सहा ब्रास वाळू साठा जप्त; तलाठ्याने पाहणी करून पंचनामा केला

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोरगाव (बु.) येथे सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने १ एप्रिल रोजी सायंकाळी छापा मारून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि वाळूचा साठा जप्त केला. महसूल विभागास याची माहिती प्राप्त होताच मंडळ अधिकारी, तलाठ्याने पाहणी करून पंचनामा केला.

बोरगाव (बु.) शिवारातील वांजरा नदी पात्रातून वाळूचा उपसा करून ट्रॅक्टर (एम. एच. ४४ एस ३०८६) वाहतूक करत असल्याच्या माहितीवरून कुमावतांच्या पथकाने १ एप्रिल रोजी सायंकाळी ट्रॅक्टरचा पाठलाग करून ट्रॅक्टर थांबवले. ट्रॅक्टर चालकाकडे ट्रॅक्टरमधील वाळूच्या पावत्या विचारले असता त्याच्याकडे पावत्या नसल्याचे स्पष्ट झाले.

ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या स्वाधीन केले. तर गावातील रमेश गव्हाणेंच्या घराच्या बाजूला वाळूचा साठा मिळाला. या वाळूच्या पावत्या नसल्याने पथकाने पुढील कारवाईसाठी तहसीलदारांना पत्र दिले आहे. दरम्यान, हनुमंत पिंपरी महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी उत्तम नागरगोजे, तलाठी सोनवणे यांनी शनिवारी वाळू साठ्याची पाहणी केली. ही वाळू अंदाजे सहा ब्रास असून याचा पंचनामा करण्यात आला. याचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला जाणार असल्याचे नागरगोजेंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...