आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ:नगर ते आष्टी मार्गावर आज धावणार रेल्वे, डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडून रेल्वे प्रशासनाला सूचना

बीड/आष्टी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर ते आष्टी या ६५ किलोमीटर अंतरावर आज शुक्रवारी पहिली प्रवासी रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण सहा थांबे असून रेल्वे प्रवाशांसाठी ४० रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे. आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करणार आहेत.

बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा बनलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर असून नगरपासून आष्टीपर्यंत ६५ किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. नगर ते नारायणडोह दरम्यान सात किलोमीटर अंतरावर मार्च २०१८ रोजी सात डब्यांच्या रेल्वेची चाचणी झाली होती. नंतर नगर-नारायणडोह-सोलापूरवाडी या १५ किलोमीटर अंतरावर २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सात डब्यांची रेल्वे चाचणी झाली. आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सोलापूरवाडी ते आष्टी ३२ किमी अंतरावर २० डिसेंबर २०२१ रोजी चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, आष्टी तालुक्यातील नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा व आष्टी या सहा स्टेशनवर तिकीट विक्री सुरू केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

आज केंद्रीय रेल्वे राज्मंत्री दानवे, मुख्यमंत्री शिंदे दाखवणार हिरवी झेंडी : रळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज शुक्रवार २३ सप्टेंबर २०२२ रोजी पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता हिरवी झेंडी दाखवून होईल. त्यांच्या समवेत खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील उपस्थित राहणार आहेत.

डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडून रेल्वे प्रशासनाला सूचना बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गुरुवार २२ सप्टेंबर २०२२ रोजी या रेल्वेमार्ग व आष्टी येथील नवीन रेल्वेस्थानकाची पाहणी करत अधिकारी व रेल्वे प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...