आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने ​​​​​​​;उद्यमिता यात्रेतून दिले जाणारे प्रशिक्षण उपयुक्त

बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने लघु व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यव्यापी उद्यमिता यात्रा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून जिल्ह्यातील तळागाळातील उमेदवारांचे समुपदेशन करून स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता बीज भांडवल प्रदान करण्यात येत आहे. त्यामुळे नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण मार्गदर्शक ठरून रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी व्यक्त केला.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड आणि युथ एड फाऊंडेशन संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्यमिता यात्रा बुधवारी (ता.८ जून) बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाली. या यात्रेचे स्वागत आणि अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी समाधान किरवले, राज्य उद्यमिता यात्रेचे मनोज भोसले, जनशिक्षण संस्थेचे श्री. देशमुख, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. कुमावत, महात्मा गांधी नॅशनल फेलो प्रतीक शाह तसेच विविध शासकीय आस्थापनांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, सन २०२० मध्ये जगावर कोरोनाचे संकट ओढवले होते. या महामारीचा फटका भारतासहित सर्व जगाला बसला. या एकंदरीत परिस्थितीचा विपरीत परिणाम ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर झाला. सद्यस्थितीत लोकांना रोजगार व स्वयंरोजगार देणे गरजेचे आहे. यासाठी उद्यमिता यात्रा रोजगार व स्वयंरोजगार देण्यास मार्गदर्शक ठरेल, असे ते म्हणाले. यावेळी युवकांची मोठी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...