आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:तीन सहायक पोलिस निरीक्षक,‎ 4 उपनिरीक्षकांच्या बदल्या‎

बीड‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस दलातील तीन सहायक‎ निरीक्षक आणि चार पोलिस‎ उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात‎ आल्या तर, पोलिस उपनिरीक्षकांना‎ सर्वसाधारण बदल्यांपर्यंत मुदतवाढ‎ दिली. एका उपनिरीक्षकाची बदली‎ विनंती अमान्य केली. अधीक्षक‎ ठाकूर यांनी आदेश काढले.‎ जिल्हा पोलिस दलात अंबाजोगाई‎ ग्रामीण ठाण्यात कार्यरत असलेले‎ सहायक पोलिस निरीक्षक संतोष‎ मिसळे यांची पोलिस अधीक्षक यांचे‎ वाचक म्हणून नियुक्ती केली गेली‎ तर, केजच्या पिंक पथकाच्या‎ महिला सहायक पोलिस निरीक्षक‎ प्रभा पुंडगे यांची पोलिस नियंत्रण‎ कक्षात बदली केली गेली.‎

माजलगाव ग्रामीणचे सहायक‎ पोलिस निरीक्षक निलेश इधाते यांची‎ शिवाजीनगर ठाण्यात बदली केली‎ होती मात्र, ती रद्द करुन आता त्यांची‎ माजलगाव शहर ठाण्यात बदली‎ केली गेली आहे. अंबाजोगाई‎ ग्रामीणचे एपीआय श्रीनिवास सावंत‎ यांची माजलगाव शहरला बदली‎ केली होती मात्र त्यांना सर्वसाधारण‎ बदल्यापर्यत मुदतवाढ दिली गेली‎ आहे. तर, नागपूर शहरहून बदली‎ होऊन आलेले एपीआय राजेंद्र घुगे‎ यांना अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात‎ पदस्थापना दिली आहे.‎ माजलगाव पोलिस उपनिरीक्षक‎ भास्कर कांबळे यांची वडवणी‎ ठाण्यात बदली केली गेली आहे तर,‎ अधीक्षकांचे वाचक असलेले राहुल‎ लाेखंडे यांची गेवराई उपपविभागीय‎ पोलिस अधिकारी यांचे वाचक‎ म्हणून बदली केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...