आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:दर्जेदार आणि विकासात्मक‎ कामांमुळे शहराचा कायापालट‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ‎ठिकाणी सिमेंट रस्ते आणि नालीचे कामे सुरू‎ आहेत. शहरातील पिंपरगव्हाण रोडच्या कामास‎ गती आली असून हे काम अंतिम टप्प्यात आले‎ आहे. अंबिका चौक ते अर्जुन नगरच्या सिमेंट‎ काँक्रिट रस्ते नालीकामास डॉ.योगेश क्षीरसागर‎ यांनी भेट देऊन आढावा घेतला व पाहणी केली.‎ याप्रसंगी डॉ.क्षीरसागर म्हणाले की, माजी मंत्री ‎जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष‎ डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून ही ‎ ‎ विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत.‎

नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून‎ देण्यासाठी अहोरात्र काम करत आहोत. शहराच्या ‎ ‎ विकासात मूलभूत सुविधांचा प्राधान्य दिले‎ पाहिजे. विकास कामांच्या माध्यमातून‎ नागरिकांच्या संपर्कात राहून प्रश्न सोडवत‎ असल्याचे सांगितले. या रस्त्याची अनेक‎ दिवसांपासून दुरवस्था झाली होती. स्थानिक‎ नागरिकांच्या मागणीवरून या रस्त्याचे काम हाती‎ घेण्यात आले. वाढत्या रहदारीसाठी हा रस्ता‎ दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने तयार करण्यात‎ येत आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी‎ माजी नगरसेवक प्रभाकर पोपळे, गणेश तांदळे,‎ शिवाजीराव जाधव, अ‍ॅड.नागेश तांबारे,‎ नगरसेवक भैय्या मोरे, रंजित बनसोडे, किशोर‎ गिराम, शशिकांत माने, गणेश क्षीरसागर,‎ राजाभाऊ पिंगळे, डॉ.बळी जोशी, डॉ.सुभाष बडे,‎ भारत गिरी, अभिमन्यू औताडे, पवन राठोड,‎ शर्विल कुलकर्णी, मोहन राऊत, बाळासाहेब‎ जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...