आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भत्ता:38 शाळांतील 504 विद्यार्थ्यांना साडेसात लाखांचा वाहतूक भत्ता मंजूर, 2 दिवसांत खात्यावर होणार जमा

बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात लॉकडाऊननंतर बीड तालुक्यात सरासरी ५ महिने चाललेल्या ३८ शाळांतील ५०४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे एकूण ७ लाख ५६ हजार रुपयांचा वाहतूक भत्ता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईने मंजूर केला आहे. दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर हा भत्ता जमा होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या तोंडावर हा भत्ता आल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात ज्या गावात चौथीपर्यंत शाळा आहे. परंतु, तीन किलोमीटरच्या आत कुठेच उच्च शिक्षणाची सोय नाही. किंवा वाडी-वस्त्यांमध्ये चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळाच नाही. अशा विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईकडून प्रत्येक महिन्याला ३०० ते ३००० हजार रुपयांपर्यंत विद्यार्थी वाहतूक भत्ता दिला जातो. असा भत्ता मिळण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थितीत असणे आवश्यक आहे.

सध्या शासनाकडून पहिली ते बारावीपर्यंतच्या ग्रामीण शाळकरी मुलांना हा भत्ता देण्यात येत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद होत्या. परंतु, लॉकडाऊननंतर ज्या बीड तालुक्यातील ३८ शाळा सुरू होत्या व अशा शाळांनी विद्यार्थ्यांच्या वाहतूक भत्तासाठी प्रस्ताव दाखल होते. त्या शाळेतील ५०४ विद्यार्थ्यांसाठी एमपीएपीने ७ लाख ५६ हजार रुपयांचा वाहतूक भत्ता ३ जून २०२२ रोजी मंजूर केला आहे. हा भत्ता बीडच्या समग्र शिक्षा अभियानाच्या जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाला असून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर तो दोन दिवसांत जमा होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

दोन वर्षांत कुठे आणि किती वाहतूक भत्ता?
२०१९-२० मध्ये जिल्ह्यातील केज तालुक्यातील शाळेतील तीन मुलांचे वाहतूक भत्त्याचे प्रस्ताव आल्याने तीन मुलांना तीन हजार रुपयांप्रमाणे भत्ता देण्यात आला. तर २०२०-२१ मध्ये बीड तालुक्यातील २१९ विद्यार्थी, अंबाजोगाई तालुक्यातील ०६ अशा एकूण २२५ विद्यार्थ्यांना एक लाख ३५ हजार रुपये मंजूर झाले होते, अशी माहिती समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक साराम काशीद यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...