आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिविगाळ:तिकीट न काढता प्रवास, बसची काचही फोडली ; ​​​​​​​धारुर तालुक्यातील एकाविरोधात गुन्हा दाखल

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्ध्या रस्त्यापर्यंतचेच तिकिट काढून पुढील प्रवासात वाहकाने तिकिटाची विचारणा केल्यावर तिकिट काढण्यास नकार देत प्रवाशाने गोंधळ घालून बसवर दगड फेकून काच फोडल्याची घटना नेकनूर पोलिस ठाणे हद्दीत लिंबागणेशजवळ घडली. या प्रकरणी धारुर तालुक्यातील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बसचालक शिलवंत वामन राऊत यांनी या प्रकरणी नेकनूर पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, राजू जनार्दन मुंडे (रा. गोपाळपूर ता. धारुर) हा प्रवासी बसमध्ये बसला होता. त्याने मांजरसुंबा पर्यंत तिकिट काढले होते. मात्र, तो मांजरसुंब्यात उतरला नाही आणि पुढे प्रवास सुरु ठेवला. यावेळी वाहकाने त्याला पुढील प्रवासाचे तििकट काढण्यास सांगितले. यावेळी राजू मुंडे याने तिकिट काढण्यास नकार देत वाहकाला शिविगाळ केली. बसवर दगड फेकून बसची काच फोडली. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात राजू मुंडे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...