आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष संगोपन:निसर्गाचा समतोल राहण्यासाठी वृक्ष संगोपन गरजेचे ; हवामान बदल व दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृक्षारोपण करून थांबून जमणार नाही तर वृक्षारोपण केलेली वृक्ष जगवावीत म्हणून त्या वृक्षांची देखभाल करून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे असे मत नवाविचार ज्योत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय होळकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास उपप्राचार्य विवेकानंद गायकवाड, डॉ. केकाण, संस्थेच्या सचिव अलका होळकर उपस्थित होतs. डॉ. केकाणसर यांनी नवाविचार ज्योत सेवाभावी संस्था व जननगरसेवक संजयभैय्या होळकर यांनी वृक्षारोपण तर केलेच परंतु परिश्रम घेऊन ते वृक्ष देखील जगवले हे अत्यंत महत्वाचे काम केले असून त्यामुळे वृक्षारोपणाचा खरा उद्देश साध्य होईल असे ते म्हणाले. हवामानात होत असलेला बदल व दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...