आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबवावे : डॉ. पांगारक

बीड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढते प्रदूषण तीव्र,पाणीटंचाई, तापमानातील वाढ यासारख्या अनेकविध समस्यांचे निवारण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी वृक्षारोपण व संवर्धना सारखे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे मत सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. गणेश पांगारकर यांनी व्यक्त केले.

येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयात 10 जून रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 24 वा वर्धापन दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने साजरा करण्यात आला. सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालया तील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने व महाविद्यालयाचे सल्लागार डॉ अरुण कुमार भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पुढे बोलताना डॉ.गणेश पांगारकर म्हणाले की,शासनाने निर्देशित केल्यानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत विद्यापीठाकडून विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत पंच्याहत्तर हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प विद्यापीठाने केला असून, सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालय ही या उपक्रमात सहभागी असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.आबासाहेब हांगे, डॉ.विवेक दुसाने डॉ.आगे,डॉ.घुगे,डॉ. नवाज शेख, डॉ.वाघ ,ग्रंथपाल डाॅ.गणेश खेमाडे,विनोद दराडे, शेख वसीम, शेवाळे मामा व राष्ट्रीय सेवा योजनेचे सचिव रोशन राठोड,गणेश काडे,प्रसाद बिडवे सह इंटरंशिप चे विद्यार्थी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...