आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​केएसके महाविद्यालय:दीपा क्षीरसागर यांचा सत्कार‎

बीड‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​केएसके महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा‎ क्षीरसागर या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या.‎ त्याबद्दल त्यांचा बीड शहरातील मातृभूमी‎ प्रतिष्ठान आणि जिल्हा सामाजिक कार्यकर्ता‎ संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या‎ वेळी डॉ. संजय तांदळे, लक्ष्मण चाटे यांची‎ उपस्थिती होती. दीपा क्षीरसागर यांनी आपल्या‎ कार्यकाळात हजारो विद्यार्थी घडवले. बीडच्या‎ नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी विकास‎ कामे केली, लोकाभिमुख प्रशासनाचा प्रत्यय‎ दिला.

विविध उपक्रम राबवून त्यांची कारकिर्द‎ त्यांनी स्मरणीय केली. महाविद्यालयातही‎ विविध उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांच्या‎ गुणांना चालना देण्याचे काम केले.‎ साहित्याच्या क्षेत्रातही भरीव कामगिरी केली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नाट्य परिषदेच्या माध्यमातून कलेला प्रोत्साहन‎ दिल्याचे तांदळेंनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...