आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:महाराष्ट्र केसरीसाठी बीडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साहिलचा सत्कार

आष्टी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ६५ किलो वजनी गटातून बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सय्यद साहिल सादिक याचा आष्टी येथे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते बुधवारी सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे सय्यद साहिल हा रिक्षा चालक सय्यद सादिक यांचा मुलगा असून त्याने प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवल्याने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुध्दे, पाणी पुरवठा सभापती किशोर झरेकर, आरोग्य व स्वच्छता सभापती सुरेश वारुंगुळे, बांधकाम सभापती शरीफ शेख, जालिंदर पोकळे, सय्यद शफी, मतीन शेख, शरद रेडेकर, शार्दुल जोशी, समीर सय्यद, फेरोज आतार, आरेफ खान आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...