आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यस्मरण:रक्तदान, व्याख्यानासह शालेय साहित्य वाटपाने जिल्ह्यात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळकांना वंदन

शिरूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी सोमवारी (ता.१ ऑगस्ट) जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. महापुरुषांच्या कार्याला शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय संस्थांच्या कार्यालयांत उजाळा देण्यात आला. रक्तदान, शालेय साहित्य वाटप व व्याख्याने अशा उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला.

बीड येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य आर.बी.चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.आर.एन. गायकवाड हजर होते. ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची यशोगाथा ‘ या विषयावर विद्यार्थ्यांची भाषणे झाली . शिक्षिका वाघमारे व शिक्षक ए.एन. पवार यांनी या दोन्ही महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला.

यशवंत विद्यालय, कुर्ला
आदर्श शिक्षण संस्थेच्या कुर्ला येथील यशवंत विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक अभिषेक राऊत, पर्यवेक्षक भोसले यांनी मार्गदर्शन करताना लोकशाहीर हे वास्तववादी लिखाणातून पुढे आलेले आहेत तर लोकमान्य यांनी स्वातंत्र्याची चळवळ तेवत ठेवली असे सांगितले. प्रास्ताविक मुसळे यांनी केले. याप्रसंगी शिक्षक कदम, माने, तुपे, मस्के, मुजाल, राख, जाधव, जामकर, दोंगरदिवे उपस्थित होते. नागरगोजे यांनी आभाप्रदर्शन केले.

चिंचोलीमाळीत रक्तदान
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १६ तरुणांनी रक्तदान करीत साठेंना अभिवादन केले.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील गलांडे यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. सेवानिवृत्त मुख्याद्यापक दिलीप गायकवाड, दगडू दळवे, डॉ. महादेव सांगळे, गुलाब पठाण, सुनील महाराज गालफाडे, राजाभाऊ भुजबळ, सचिन राऊत, मनोज घोडके, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप गालफाडे, उपाध्यक्ष प्रकाश गालफाडे, सचिव संदीप गालफाडे आदी हजर होते.

बलभीम महाविद्यालय
येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. संतोष उंदरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. विजय गुंड, डॉ. बाबासाहेब कोकाटे, डॉ.आश्रुबा दन्ने, डॉ. नरेंद्र मुदीराज, डॉ. अमोल पालकर, डॉ. महादेव साखरे, प्रा. महादेव शिंदे आदींची हजेरी होती.

मा. विद्यालय, मारफळा
माध्यमिक विद्यालय मारफळा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस प्रभारी मुख्याध्यापक ठोंबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख वाव्हळ यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वेताळ यांनी महापुरुषांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

राजर्षी कन्या विद्यालय
बीड येथील राजर्षि शाहू कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व्यवसाय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.शिवाजीराव खांडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बलभिमराव जाहेर पाटील, संस्थेचे सचिव प्रा.जे.पी. शेळके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर, गायकवाड सर, प्रा.एस.एस.खांडे यांची उपस्थिती होती.

केएसके महाविद्यालय, बीड
येथील केएसके महाविद्यालयात प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर अध्यक्षीय स्थानावरून बोलताना महापुरुषांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी समाज बांधव हजर होते.

बातम्या आणखी आहेत...