आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिसर्ग विविधतेने नटलेला असला तरीही अतिशय गुढ आहे. निसर्गातच निसर्गाचे रहस्य व हवामानाचा अंदाज दडलेला आहे. तो ओळखून शेतकऱ्यांनी पिके घ्यावीत, असे स्पष्ट मत हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी व्यक्त केले. कामधेनू सेवाभावी संस्था संचलित वसुंधरा महाविद्यालयास हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी मंचावर कामधेनू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब देशमुख, उपाध्यक्ष डॉ.समद शेख, संचालक व पत्रकार नृसिंह सुर्यवंशी, लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालय परळीचे कोषाध्यक्ष प्रा.मनोज देशमुख, प्राचार्य डॉ.एल.एस.मुंडे, वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण दळवे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने पंजाबराव डख यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना पंजाबराव डख म्हणाले की, पूर्वी वेधशाळा नव्हत्या तरीही आपले पूर्वज निसर्गातील विविध बदलावरून, पशु-पक्षी यांच्या वागण्यावरून आणि अनेक प्रकारच्या झाडावरून उन्हाळा, हिवाळा, पावसाळा याचा अंदाज बांधत आणि आपली पिके घेत असत. आपल्या ग्रंथातसुध्दा निसर्गाची अतिशय गहन अशी मार्गदर्शक माहिती असून अभ्यासांती ते समजून घेता येऊ शकते. निसर्गातच निसर्गाचे रहस्य दडलेले आहे.
शेतकऱ्यांनी हवामानानुसारच पिके घ्यावीत, असे सांगत पंजाबराव डख यांनी उपस्थितांना हवामान अंदाजाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पत्रकार नृसिंह सूर्यवंशी यांना कै.नंदकुमार पांचाळ स्मृती पुरस्कार भेटल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.अलका देशमुख यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.मकरंद जोगदंड यांनी केले तर आभार प्रा.डॉ. जगन्नाथ तुडमे मानले. यावेळी वसुंधरा महाविद्यालय व कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी येथिल प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आताच्या पिढीने निसर्गातील बदल लक्षात घ्यावे आपल्या जुन्या पिढ्या निसर्गातील बदल लक्षात घेत हवामान अंदाज बांधायचे तंत्र विकसित केले होते. आताच्या पिढीचा मात्र निरीक्षण आणि अभ्यास कमी झाला आहे. त्यामुळे भवतालकडे नव्याने पाहण्याची गरज असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.