आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकऱ्यांत उत्साह:तुकोबारायांच्या दिंडीस मानाचे स्थान,  दोन वर्षांच्या खंडानंतर वारकऱ्यांत उत्साह

केज3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात औरंगपूर (ता. केज) येथील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानच्या दिंडीला मानाचे स्थान आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा वारकऱ्यांत उत्साह दिसून येत असून या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले.

आषाढी एकादशीला केज तालुक्यातील तीर्थक्षेत्र, संस्थानसह अनेक गावांतून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ घेऊन पायी चालत पंढरपूरला जातात. १० वर्षांपूर्वी औरंगपूर येथे स्थापन केलेल्या संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महादेव महाराज बोराडेंसह संस्थानचे विद्यार्थी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातून श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी पायी वारी करत आहेत. यापूर्वी महादेव महाराज बोराडे हे १७ वर्षे माउलींच्या पालखी सोहळ्यातून दिंडीत जात होते. त्यांचे वडील विष्णुदास गुंडिबा बोराडे यांनी पंढरीच्या वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मागच्या वर्षीपासून एकटेच पायी वारीला जाताहेत. केज तालुक्यातील पावनधामची ही दिंडी आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उंडवडी (गवळ्याची), बारामती, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, कुरोली, वाखरी असा मुक्काम करत पंढरपूरला रवाना होत आहे.

बातम्या आणखी आहेत...