आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आठ आश्रमशाळांचा बारावी परीक्षेचा निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त; 579 विद्यार्थी प्रथम श्रेणीत

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय विभागामार्फत बीड जिल्ह्यात चालविल्या जाणाऱ्या आठही उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. आठही आश्रमशाळांचा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. एकूण ३०५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर तब्बल ५७९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

हा निकाल पुढीलप्रमाणे - उच्च माध्यमिक आश्रम शाळा, मराठवाडी तांडा बीड १०० टक्के निकाल. कै. डी. आर. राठोड उच्च माध्यमिक आश्रमशाळा दारावती रोड १०० टक्के निकाल, तिरुपती उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पाचेगाव बीड : ९८.९३ टक्के, छत्रपती राजर्षि शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय, कौडगाव (हुडा), ९७ टक्के, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, वारोळा ता. परळी वैजनाथ : ९७ टक्के, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, गेवराई : ९६.९६ टक्के, उच्च माध्यमिक आश्रमशाळा अंथरवण पिंप्रि जि. बीड : ९६.५० टक्के, सखारामजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वसंत नगर ता. परळी : ९५.१२ टक्के निकाल.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रोत्साहनामुळे बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांना डिजीटल बनविण्यासाठी विशेष योगदान दिले जात आहे. निवासी मुलांच्या अभ्यासासाठी मोबाईल टॅबची सुविधा प्राप्त करून देण्यात येत आहे. सर्व आश्रम शाळा रंगरंगोटीयुक्त झाल्या आहे.

सर्व कर्मचारी यांना ‘ड्रेस कोड' दिले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दिले आहे. त्यानंतर वर्षभर शिक्षकांनी नियोजन बध्द पध्दतीने शिक्षण शिकविले आहे. त्यामुळे गुणवत्तेत कमालीची वाढ झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी, लक्ष्मण बारगजे, प्रमोद सानप, घुले, खाडे व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

बातम्या आणखी आहेत...