आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता:वीस वर्षांनंतर काकडहिरा गावाला‎ मिळाला डांबरी रस्ता; कामास सुरुवात‎

बीड‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील‎ काकडहिरा या गावचा जोडरस्ता‎ अनेक वर्षांपासून दयनीय अवस्थेत‎ होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र‎ मस्के यांनी विशेष प्रयत्न करून‎ काकडहिरा गाव रस्त्यासाठी जिल्हा‎ वार्षिक नियोजनांतर्गत डांबरी रस्ता‎ कामासाठी निधीची तरतूद करून हा‎ रस्ता मंजूर करून घेतला. प्रत्यक्षात‎ या रस्त्याचे काम सुरु झाले असून‎ मस्के यांनी रस्त्याची पाहणी केली.‎

काही वर्षांपासून काकडहिरा‎ येथील ग्रामस्थांनी आमच्या गावच्या ‎रस्त्याचे डांबरीकरण कामासाठी‎ निधी मंजूर करून रस्ता सुधारणा‎ करा, अशी मागणी लावून धरली‎ होती. राजेंद्र मस्के यांनी या रस्ता ‎डांबरीकरणाच्या कामास मंजुरी मिळवून दिली असून या कामाची पाहणीही मस्के यांनी केली. यावेळी‎ सरपंच अश्विन शेळके, प्रकाश‎ बागलाने, बाळू बागलाने, संदीपान‎ बागलाने, अशोक बागलाने,‎ बद्रीनाथ जटाळ, बंडू मस्के, महेश‎ सावंत आदी उपस्थित होते.‎ पिंपळवाडी- भाळवणी रस्त्यावरील‎ बिंदुसरा नदी पुलामुळे‎ वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत‎ होता. या पुलाच्या कामासाठी पाच‎ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला‎ असून, लवकरच हे कामही सुरु‎ होणार असल्याचे राजेंद्र मस्के यांनी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...