आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी होऊ नये म्हणून आग लावल्याची चर्चा:दोन घंटागाड्या खाक, सात गाड्या वाचल्या

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर परिषदेच्या चालू स्थितीतील परंतु वापराअभावी पडून राहिलेल्या घंटागाड्यांना शनिवारी दुपारी अचानक आग आगली. या आगीत दोन घंटागाड्या जळून खाक झाल्या असून अग्निशमन दलाच्या बंबांनी या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवल्याने उर्वरित सात घंटागाड्या वाचल्या. माजलगाव नगरपालिकेतील विविध विभागांची सध्या चौकशी केली जात असून घंटागाड्याची चौकशी होऊ नये म्हणून कोणीतरी आग लावण्याची चर्चा शहरात सुरू आहे.

माजलगाव नगर परिषदेच्या सफाई कामासाठी पियागो कंपनीच्या घंटागाड्या तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या कार्यकाळात शहरात दाखल झाल्या होत्या. शहरात साफसफाईचा ठेका ठेकेदाराला देण्यात आल्याने जवळपास १० घंटागाड्यांचा वापर थांबला असल्याने ही वाहने गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या नगर परिषदेच्या जागेत लावण्यात आलेली होती. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याने मोठी धावपळ उडाली. या आगीत ९ गाड्यांपैकी २ गाड्या जळून खाक झाल्या. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आग आटोक्यात आली. नगर परिषद कर्मचारी संतोष घाडगे, शेख आरेफ, बाबर यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समोर आले नसून सदरील आग अज्ञात व्यक्तीने लावल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...