आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दोन कारची समोरासमोर धडक; महिला पोलिसासह मुलगा जागीच ठार

परळी, सिरसाळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजारी मुलाला दवाखान्यात उपचारासाठी कारने घेऊन जात असताना दोन कारची धडक होऊन झालेल्या अपघातात महिला पोलिसासह तिच्या नऊ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू, तर कारचालक पोलिस जखमी झाला. ही घटना परळी- सिरसाळा मार्गावर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.

कोमल शिंदे (३२, रा. कावळ्याची वाडी, ता. परळी) आणि अथर्व शिंदे अशी मृतांची नावे आहेत. दुसऱ्या कारमधील वैद्यकीय अधिकारी खान मोहंमद इलियास हे जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोमल शिंदे आजारी अथर्वला रुग्णालयात घेऊन जात असतानाच हा अपघात झाला.

बातम्या आणखी आहेत...