आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुःखद:गेवराईत सासुरवाडीला निघालेल्या जावयासह 2 मुले पुरात गेली वाहून

गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमृता नदीच्या पुलावर पुराचा अंदाज न आल्याने घडली घटना

पंचमीसाठी दोन मुलांना दुचाकीवरून सासुरवाडीला घेऊन जाताना नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरील बाप-लेकासह मुलगी वाहून गेल्याची घटना गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री नऊ वाजता घडली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी मुलीचा मृतदेह व दुचाकी सापडली असून बाप-लेकाचा शोध सुरू आहे.

शेवगाव तालुक्यातील कृष्णा बाळासाहेब घोरपडे (३२) यांची देवपिंप्री ही सासुरवाडी असून गुरुवारी रात्री आठ वाजता ते बालमटाकळी येथून मुलगा प्रथमेश (८) व वैष्णवी (६) या दोघांना घेऊन देवप्रिंप्रीकडे निघाले. याच वेळी पौळाचीवाडी येथील अमृता नदीला पावसामुळे पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने घोरपडे हे दोन मुलांसह वाहून गेले.

...रात्री नऊ वाजता फोन शेवटचाच
गुरुवारी रात्री नऊ वाजता कृष्णा घोरपडे यांनी “मी पौळाचीवाडी जवळ आहे, आता खूप पाऊस पडतोय’ असा फोन केला होता. त्यानंतर त्यांचा फोन लागलाच नाही. हा शेवटचाच फोन ठरला.