आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:दोन दिवसांची मुदत, जिल्ह्यातील सहा नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात एकूण सहा नगरपालिका आहेत. प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयाेगाच्या आदेशानुसार फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाला हाेता. त्यानुसार राज्य निवडणूक आयाेगाने सुधारित हरकती, सूचना व सुनावणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. अखेर दाेन महिने विलंबाने पूर्वीची प्रारूप प्रभाग रचना कायम राहिली आहे. त्यामुळे ज्यांनी पूर्वीच राजकीय गणिते निश्चित केली त्यांना दिलासा मिळाला हाेता. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना पूर्ण झाली असून जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयाेगाने गुरुवारी (९ जून) प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार दाेन दिवसांच्या मुदतवाढीचे आदेश पत्र जिल्हाधिकारी यांना दिले.

मे २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या ‘अ’,‘ब’आणि ‘क’ वर्ग दर्जाच्या पालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला होता. दरम्यान, नवीन तरतुदीनुसार राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे करण्याचे निर्देश आयाेगाने जिल्हाधिकाऱ्यांना १४ मार्च २०२२ रोजी दिले होते.

मात्र, सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाने सुधारणा अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर स्थगित केलेल्या टप्प्यापासून स्थानिक स्वराज्य निवडणुकांची कार्यवाही पुढे सुरू करण्याचे ४ मे २०२२ रोजी आदेश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी ६ मे २०२२ रोजी सुधारित प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या हरकती व सुनावणी सुधारित कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाला.

आयोगाच्या निर्देशानुसार ‘अ’, ‘ब’ व ‘क’ दर्जानुसार पालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनांना मान्यता दिली. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मान्यता दिल्यानंतर पूर्वीच्या नियोजित तारखेनुसार मंगळवारी (७ जून) अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार होती. मात्र, मंगळवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले. त्यामुळे अंतिम प्रभाग रचना कशी असणार हे समजण्यासाठी आता दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

आदेशानुसार कार्यवाही केली जाईल
प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम देण्यात आलेला हाेता. मात्र, त्यात अंशत: बदल करण्यात आला. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. अंतिम अधिसूचना शासन राजपत्र निश्चित ठिकाणी प्रसिद्धीची तारीख गुरुवार ( ९ जून) अशी आहे. त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल.
-नीता अंधारे, जिल्हा प्रशासन अधिकारी, पालिका विभाग.

बातम्या आणखी आहेत...