आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या ताब्यात:मोबाइल चोरट्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी ; केज पोलिसात गुन्हा दाखल

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज शहरातील मंगळवार पेठेतील आठवडी बाजारातून बाजारकरूंचा मोबाईल चोरी करताना पकडलेल्या एका चोरट्यास दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चिंचोलीमाळी येथील जयदत्त उर्फ बाळासाहेब कल्याणराव गलांडे हे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास केज शहरातील मंगळवार पेठेतील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. ते भाजी खरेदी करीत असताना एका चोरट्याने त्यांच्या खिशातून मोबाईल काढून बाजूला जाऊन उभा राहिला. तेवढ्यात गलांडे यांच्या ओळखीच्या व्यक्तीने तो प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी मोबाईल अभिषेक अशोक जोझोरे (रा. बीड) यास पकडले. त्याने सुरवातीला उडवाउडवी केली. मात्र, त्यांनी पोलिसांच्या ताब्यात देतो म्हणताच मोबाईल देतो, पण सोडून द्या अशी विनवणी केली. त्यांनी मोबाईल हस्तगत केल्यानंतर या चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.

जयदत्त गलांडे यांच्या फिर्यादीवरून अभिषेक जोझोरे या मोबाईल चोराविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...