आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गट भिडले:आहेर चिंचोलीत शेतीच्या वादातून दोन गट भिडले

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वादातून बीड तालुक्यातील बाहेर चिंचोलीत दोन गट समोरासमोर आले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांकडील एकूण २१ जणांविरोधात बीड ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात राधाबाई रावसाहेब रुपनर (५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेत रस्त्यातून जायचे नाही असे कारण काढून त्यांना शिविगाळ करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बाबुलाल कारांडे, रामनाथ कारांडे, श्रीराम कारांडे, नाथ कारांडे, राजू बाई कारांडे, अक्कुबाई कारांडे, शोभा कारांडे (सर्व रा. लोळदगाव ता. बीड) आणि भागवत सखाराम कोळे (रा. श्रृंगारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला.

तर, याच प्रकरणात रुख्मीणबाई कारांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, राधाबाई रुपनर, आत्माराम रुपनर, परमेश्वर रुपनर, बाळू रुपनर, बदाम रुपनर, राजाभाऊ रुपनर, सर्जेराव रुपनर, विजय रुपनर, दत्ता रुपनर, अशोक रुपनर, अजय कारांडे, बाबासाहेब पेटे, हनुमान पेटे (सर्व रा. आहेर चिंचोली ता .बीड) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...