आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमरातुमरी:वित्त आयोगाच्या निधीवरून भाजपच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांत हमरातुमरी

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंधराव्या वित्त आयोगातील निधीच्या कामावरून गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातच भाजपच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांत हमरातुमरीचा प्रकार नुकताच घडला. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. ग्रामपंचायतीला लोकसंख्येनुसार शासनाकडून वित्त आयोगातील निधी येतो. त्यातील कामांबाबत गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी भाजपचे एक माजी जिल्हा परिषद सदस्य आले होते. काही वेळाने भाजपच्या माजी पंचायत समिती सदस्याचे दीर आले. त्यांच्यात कामाच्या वाटाघाटीवरून जोरदार वाद पेटला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...