आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:केज तालुक्यात छळाच्या दोन घटना; सासरच्या मंडळींवर गुन्हा

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहितेच्या छळाच्या दोन घटना केज तालुक्यात समोर आल्या. नाव्होली माहेर असलेल्या गंगा सोनाजी कदम ( ३८) या महिलेचा विवाह १८ वर्षांपूर्वी साखरे बोरगाव (ता. जि. बीड) येथील सोनाजी उत्तम कदम याच्याशी झाला होता. मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून तिचा सतत शिवीगाळ व मारहाण करीत छळ केला. त्यानंतर तिच्या पतीने सीमा नावाच्या महिलेशी दुसरा विवाह केला. दुसऱ्या लग्नानंतर पती व सवत यांनी मारहाण करुन धमकी दिली अशी तक्रार गंगा कदम यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल झाला.

दुसऱ्या घटनेत साळेगाव माहेर असलेल्या पूजा बालाजी मस्के (३०) हिचा विवाह वाजरखेडा (ता. जि. लातुर) येथील बालाजी रामा मस्के याच्याशी झालेला आहे. एक लाख रुपये घेऊन ये, शेतीचा हिस्सा घे असे म्हणत पती बालाजी मस्के, सासू पदमीन मस्के, नणंद अहिल्या गायकवाड, सावित्रा मगर, अरूणा भडंगे, करूणा गालफाडे, बालाजी गालफाडे, राहुल मगर, गणेश गायकवाड, कोमल मगर यांनी सतत मारहाण करीत छळ केला.

बातम्या आणखी आहेत...