आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव कार-दुचाकी अपघातात दोन ठार

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड-वडवणी मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. रविवारी दुपारी भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारचालकही जखमी झाला.

माजलगाव तालुक्यातील शहापूर येथील रामकृष्ण भगवान बादाडे व कृ़ष्णा सत्यप्रेम बादाडे हे काही कामानिमित्त रविवारी सकाळी बीडला आले होते. काम आटोपून माजलगावकडे जात असताना बीड- वडवणी मार्गावर मौज जवळ त्यांच्या दुचाकीला (एमएच ४४ ई ९८५२) समोरुन आलेल्या कारने जोराची धडक दिली. यात रामकृष्ण बादाडे व कृष्णा बादाडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, कार चालक नितीन सुभाष मिटकरी (रा. माजलगाव) हा जखमी झाला.

बातम्या आणखी आहेत...